शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वगुणसंपन्न मैत्रेयी : शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातही वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:33 IST

एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी गुणवैशिष्ट्ये असतात, की देवाने त्यांना वेगळी बुद्धिमत्ता दिली की काय, असेच वाटते. मैत्रेयी मोहन घनोटे ही यातीलच एक आहे. १६ वर्षाच्या मैत्रेयीने आजपर्यंत ४५० हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहे. संगीत, नृत्य, वक्तृत्व, कला, नाट्य, अभिनय या क्षेत्रात अफलातून कामगिरी करणाऱ्या मैत्रेयीने शिक्षण क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. दहावीच्या परीक्षेत मैत्रेयीला ९९.२० टक्के गुण मिळाले आहे. मैत्रेयीच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला ‘सर्वगुणसंपन्न’ हेच विशेषण साजेसं आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी गुणवैशिष्ट्ये असतात, की देवाने त्यांना वेगळी बुद्धिमत्ता दिली की काय, असेच वाटते. मैत्रेयी मोहन घनोटे ही यातीलच एक आहे. १६ वर्षाच्या मैत्रेयीने आजपर्यंत ४५० हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहे. संगीत, नृत्य, वक्तृत्व, कला, नाट्य, अभिनय या क्षेत्रात अफलातून कामगिरी करणाऱ्या मैत्रेयीने शिक्षण क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. दहावीच्या परीक्षेत मैत्रेयीला ९९.२० टक्के गुण मिळाले आहे. मैत्रेयीच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला ‘सर्वगुणसंपन्न’ हेच विशेषण साजेसं आहे.क्रीडा, संगीत, अभिनय या क्षेत्रातील दिग्गजांचा बायोडाटा बघतो तेव्हा, शिक्षणामध्ये या दिग्गजांची कामगिरी सुमार असते. पण मैत्रेयीचे असे नाही. ती प्रत्येक क्षेत्रात प्रतिभासंपन्न आहे. वयाच्या सातव्या वर्षी राष्ट्रपती भवनात ‘माय कंट्री’ या विषयावर धडाधड भाषण तिने ठोकले. चेहऱ्यावर सदैव हास्य ठेवणारी मैत्रेयी जेव्हा शिवाजी महाराज, झाशीची राणी, लोकमान्य टिळकांवर कीर्तन करते, तेव्हा तिचा भारदस्त आवाज सर्वांना प्रभावित करतो. शहरात होणाऱ्या कथाकथन, वक्तृत्वाची एखादीच स्पर्धा तिने सोडली असेल. प्रत्येक स्पर्धेत मैत्रेयीचे पारितोषिक पक्केच असते. तिने लिहिलेल्या ‘मेरा आदर्श गाव’ या नाटकाला राष्ट्रीय स्तरावर दुसरे पारितोषिक मिळाले आहे. ती शिवाजी महाराज, झांशीची राणी यावर वयाच्या दहाव्या वर्षापासून जाहीर कीर्तन करीत आहे. या मुलीला चित्रकलेतही एवढी आवड आहे, की राज्यस्तरावर तिने पारितोषिक पटकाविले आहे. तिचे शास्त्रीय नृत्यातील पदलालित्य जसे परिपूर्ण आहे तेवढीच उत्तम कॅसिनोही ती वाजविते. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार, सावित्रीबाई फुले फेलोशिप, महाराष्ट्र भूषण, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कलाभूषण, विदर्भरत्न व अनेक बाल गौरव पुरस्काराने मैत्रेयीला गौरविण्यात आले आहे.एवढे सर्व गुणवैशिष्ट्य असताना मैत्रेयीने शाळेत कधी पहिला नंबर सोडला नाही. दहावीतही ९९.२० टक्के गुण तिने संपादन केले. खूप अभ्यास नाही, पण तिच्या अभ्यासात सातत्य होते. टीव्हीवरची मालिका तिने कधी सोडली नाही. विशेष म्हणजे दहावीच्या वर्षात डेंग्यूमुळे ती महिनाभर आजारी होती. पण असामान्य बुद्धिमत्तेच्या मैत्रेयीवर काहीच परिणाम झाला नाही. मैत्रेयी म्हणते तिच्या अंगीभूत कलागुणांचा अभ्यासातही फायदा होतो.तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अभिमानमैत्रेयीचे लहानपणापासून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व राहिले आहे. ती खूप धीट आहे. सात वर्षाची असताना तिने राष्ट्रपतीला प्रश्न विचारला आहे. मैत्रेयीने प्रत्येक स्पर्धेत पारितोषिक मिळविले आहे. तिच्या एकंदरीत कामगिरीवरून ९९ टक्के गुण मिळतील असा आम्हाला विश्वास होता. तिच्यातील या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे आम्हाला तिचा अभिमान आहे.मृण्मयी घनोटे, आई

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर