दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास

By Admin | Updated: August 10, 2014 01:30 IST2014-08-10T01:30:19+5:302014-08-10T01:30:19+5:30

पूर्वीचे व आताचे दक्षिण नागपूर यात फरक आहे. गेल्या दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास केल्याचे प्रतिपादन आमदार दीनानाथ पडोळे यांनी शनिवारी केले. दत्तात्रयनगर येथील महाकाळकर

The all-round development of South Nagpur in ten years | दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास

दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा : दीनानाथ पडोळे यांचे प्रतिपादन
नागपूर : पूर्वीचे व आताचे दक्षिण नागपूर यात फरक आहे. गेल्या दहा वर्षांत दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास केल्याचे प्रतिपादन आमदार दीनानाथ पडोळे यांनी शनिवारी केले. दत्तात्रयनगर येथील महाकाळकर सभागृहात आयोजित काँग्रेसच्या दक्षिण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी राज्यमंत्री विनोद गुडधे-पाटील, गेव्ह आवारी, अशोक धवड, शेख हुसेन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, विलास बांगरे, प्रवीण आगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दक्षिण नागपुरातील जागा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विधानसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये शहरातील आरक्षण रद्द करण्यासाठी समिती गठित केली. आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. या भागातील बाबा ताजुद्दीन दर्ग्याचे सौंदर्यीकरण व परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून १३२.५० कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. गीता मंदिराच्या बाजूला सुभाष रोडवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल उभारले. रिंगरोडपलीकडे विकासाची कामे केली. पाण्याची लाईन, मलवाहिका टाकल्याची माहिती पडोळे यांनी दिली. यावेळी नगरेवक दीपक कापसे, सुजाता कोंबाडे, तनवीर अहमद, शीला तराळे, नैना झाडे, योगेश तिवारी, प्रशांत धवड, वासुदेव ढोके, संजय महाकाळकर, अगाज खान, उमेश शाहू, गजराज हटेवार, जयंत लुटे, सूर्यकांत भगत, रामगोविंद खोब्रागडे, अशोक यावले, इसाक मसुरी, राजेश बेलखोडे, शंकर सुगंध, भोला कुचनकर, इब्राहिम भाई, परमेश्वर राऊ त आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The all-round development of South Nagpur in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.