नांगिया कार्समध्ये ऑल-न्यू एमजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:34+5:302021-01-13T04:17:34+5:30
नागपूर : नवीन वर्षांच्या आगमनावर ऑटोमोबाईल प्रेमींसाठी स्पोर्ट्स क्लास, शानदार वैशिष्ट्ये, नेक्स्ट जनरेशन एलिमेंट्स आणि दिसण्यात अत्यंत आकर्षक असलेली ...

नांगिया कार्समध्ये ऑल-न्यू एमजी
नागपूर : नवीन वर्षांच्या आगमनावर ऑटोमोबाईल प्रेमींसाठी स्पोर्ट्स क्लास, शानदार वैशिष्ट्ये, नेक्स्ट जनरेशन एलिमेंट्स आणि दिसण्यात अत्यंत आकर्षक असलेली नवीन हेक्टर २०२१ ला नांगिया कार्समध्ये अक्षित नांगिया आणि अभिमन्यू नांगिया यांच्या हस्ते दाखल करण्यात आली. एमजी मोटर इंडियाने नवीन हेक्टर २०२१ ला १२.८९ लाख रुपयाच्या सुरुवातीच्या रेंजमध्ये दाखल केली आहे. यामध्ये विभिन्न फर्स्ट इन सेगमेंट फिचर्स, ड्युएल टोन एक्सटेरियर आणि इंटेरियरचा समावेश आहे. यात अन्य पर्यायही दिले आहेत. देशातील या पहिल्या इंटरनेट एसयूव्हीमध्ये ओव्हरपॉवरिंग लूक, ऑल न्यू बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रील, लक्झरी कॅम्पेन आणि ब्लॅक ड्युएल टोन थीम इंटेरियर, १८ इंच स्टायलिश ड्युएल टोन अलॉय, अपडेटेड आय स्मार्ट, इंडस्ट्रीची पहिली हिंगलिश वॉईस कमांड आणि अन्य फिचर्स देण्यात आले आहेत. हेक्टर आता सात सीट अवतार आणि पाच व सहा सीट पर्यायासह आहे. सात सीटांची हेक्टर प्लस एक इंटरनेट एसयूव्ही आहे. यामध्ये पॅनासोमिक सनप्रूफ आणि १८ इंच स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत. यामध्ये जास्त जणांसाठी दुसऱ्या रांगेत तीन वयस्कांसाठी बेंच सीट आणि तिसरी रांग दोन मुलांसाठी आहे. सात सीटांची गाडी स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि नवीन सिलेक्ट ट्रीम लेव्हलसह आहे. हेक्टर प्लस २०२१ सहा सीटची गाडी कॅप्टन सीटसह आहे. नांगिया कार्स, एमजी नागपूर, प्लॉट नं. ३३/बी, एमआयडीसी वाडी रोड, नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर आहे. (वा.प्र.)