अड्ड्यावर सर्व सुविधा
By Admin | Updated: August 13, 2014 00:47 IST2014-08-13T00:47:46+5:302014-08-13T00:47:46+5:30
जुगार अड्ड्यावर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. लकडगंज आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही महिन्याला लाखो रुपये मिळतात. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलीस जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करतात.

अड्ड्यावर सर्व सुविधा
नागपूर : जुगार अड्ड्यावर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. लकडगंज आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही महिन्याला लाखो रुपये मिळतात. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलीस जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करतात. नव्यानेच रुजू झालेल्या परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांना या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच बावाजीकडे बातमी पोहोचू शकते, ही भीती असल्यामुळे पद्धतशीर सापळा रचण्यात आला. परिमंडळ १ चे उपायुक्त अभिनाश कुमार यांनी धाडीची योजना आखली. आज पहाटे २.४५ वाजता पोलिसांचा ताफा घेऊन उपायुक्त अभिनाश कुमार आणि उपायुक्त निर्मला देवी यांनी अशोक बावाजीच्या अड्ड्यावर धाड घातली. यावेळी येथे देवेंद्र रामभाऊ आखरे (वय ५१, बुधवारी, पिवळी मार्बतजवळ), रमेश गणपती पुणेकर (वय ४२, रा. गोळीबार चौक, पसारकर मोहल्ला), मनोज ज्ञानचंद जैन (वय ४७, रा. वर्धमाननगर), ईश्वर लोटन गौर (वय ३४, रा. हंसापुरी छोटी खदान), दिनेश भरतलाल जैन (वय ४७, रा. लालनगर), नरेश सुरेश हिवराळे (वय २७, रा. जागनाथ बुधवारी), शेख आबीद शेख युसूफ (वय ३१, रा. सतरंजीपुरा), महेश चंपालाल यादव वय ३७, रा. नयापुरा),
अमित हिरालाल गुप्ता (वय ३५, रा. चाफेकर चक्कीजवळ, शेंडेनगर), मोहम्मद शफी अब्दुल मुनाफ (वय ४८, टेका आशीनगर), रिजवान हसन कुरेशी (वय ३३, रा. जाफरनगर), मोहम्मद जावेद मोहम्मद शकूर (वय ३३, रा. नवाबपुरा), आनंद श्रीवास्तव (वय ४१, रा. लालगंज खैरीपुरा), अजय कमलप्रसाद शुक्ला (वय ३८, रा. महेंद्रनगर), फिरोज खान मंजूर खान (वय ३३, रा. महेंद्रनगर), शहादीप मोहम्मद शकील (वय ३४, रा. जागनाथ बुधवारी), मोहम्मद इमरान मोहम्मद रशीद (वय २३, रा. अनंतनगर), रिजवान खान बहादूर खान (वय ४२, रा. शांतिनगर), प्रेमलाल रतनलाल अहीर (वय ३७, रा. बस्तरवारी नागोबा मंदिराजवळ), नारायण तुळशीराम खापेकर (वय ४३, रा. पाचपावली पहिला रेल्वे फाटक जवळ), राजेश सुरेश साधनकर (वय ३४, रा. यादवनगर), धीरज श्यामलाल ठाकूर (वय ३२, रा. आशीर्वादनगर, हुडकेश्वर रोड), मनोज कृष्णराव डोमारकर (वय ३६, रा. टिमकी, भानखेडा), शेख याकत अली शेख गुलाब अली (वय ५१, रा. अवस्थीनगर, गिट्टीखदान), दुर्गेश गणेश डागोर (वय २९, रा, गंजीपेठ, गणेश चौक), रफीक खान अजीज खान (वय २७, रा. जाफरनगर, गिट्टीखदान), सुशील रामदास शिर्के (वय २७, रा. त्रिमूर्तिनगर), श्रीकांत रामकृष्ण जगनाडे (वय ३९, रा. जुनी शुक्रवारी) यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजार २६० रुपयांची रोकड, २७ मोबाईल, ५ दुचाकी, एलसीडी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. (प्रतिनिधी)