शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:36 IST

प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.

ठळक मुद्देप्रचार प्रसिद्धीबरोबरच समित्यांचेही गठन : कृषी केंद्रावर विभागाचा जास्त फोकस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१७ मध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अख्खी यंत्रणात हादरली होती. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला होता. सरकारवर ताशेरे ओढले गेले होते. प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीच्या माध्यमातून विषबाधा रोखण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका, गावपातळीवर समित्यांचे गठन करण्यात आले असून, कृषीकेंद्र संचालकांना जिल्हा व तालुका पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे.कृषी विभागाने २०१७ मध्ये झालेल्या विषबाधेची कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यातून काही निष्कर्ष पुढे आले होते. शेतकऱ्यांचे अज्ञान, जनजागृतीचा अभाव, चुकीची फवारणी, सुरक्षेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष अनेक कारणे पुढे आली होती. यावर्षी खरीपाच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या आहे. पीक शेतात उभी झाली आहे. आता शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची मागणी होणार आहे. हीच वेळ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची असल्याने कृषी विभागाने आता पथकच तयार केले आहे. तालुका कृषी अधिकारी, पं.स.कृषी अधिकारी, खते-बियाणे-कीटकनाशक निरीक्षकांचे पथक तयार करून गावामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कीटकनाशक वापरण्यासंदर्भात नियमावली, काळजी घेण्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. बोंड अळीचे व्यवस्थापन आणि विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फ्लेक्स, पत्रक कृषी केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येत आहे. गावस्तरावर, तालुकास्तरावर सभा घेऊन कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. विषबाधेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्या सीएसआर फंडातून शेतकऱ्यांना फवारणी कीट, फोरोमन ट्रॅप उपलब्ध करून देणार आहे. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांची गावपातळीवर समिती तयार करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत विषबाधा निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांचे वाचन होणार आहे.कीटकनाशक म्हणजे एकप्रकारचे विष. शेतकरी जेथून कीटकनाशक नेतात, त्याकृ षी केंद्रावर आम्ही फोकस केले आहे. त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नियमावली, अटी शर्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्याचा चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी, जि.प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती