दारू तस्करास पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST2021-01-08T04:25:04+5:302021-01-08T04:25:04+5:30

नागपूर : दारू तस्करीत सहभागी असलेल्या एका युवकाला कोराडी पोलिसांनी माऊझर व काडतुसासह अटक केली. कपिल ऊर्फ सानू ...

Alcohol smuggler arrested with pistol | दारू तस्करास पिस्तुलासह अटक

दारू तस्करास पिस्तुलासह अटक

नागपूर : दारू तस्करीत सहभागी असलेल्या एका युवकाला कोराडी पोलिसांनी माऊझर व काडतुसासह अटक केली. कपिल ऊर्फ सानू संतोष साहू (२२) रा. रामनगर, कोराडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कपिल हा रामनगर ग्रामपंचायतसमोर राहतो. कोराडी पोलिसांना मारुती कार क्रमांक एम.एच. -३१-ए.जी.-७७०६ मध्ये दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी शिवानी साहू किराणा दुकानाजवळ कारला रोखले. कारची झडती घेतली असता त्यात दारूसोबतच माऊझर (पिस्तूल) आणि पाच काडतुसे व चाकूही सापडला. पोलिसांनी दारू व शस्त्र जप्त करून सानूला ताब्यात घेतले. सानूचे किराणा दुकान आहे. तेथून तो अवैध दारुची विक्री करीत होता. त्याच्याविरुद्ध दारु तस्करी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Alcohol smuggler arrested with pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.