शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेतील वाद भोवला

By admin | Updated: September 13, 2014 02:42 IST

दारूच्या नशेत दादागिरी करून अमोल संजय नेवारे (वय २४) याने आपला चारचौघात अपमान केला.

नागपूर : दारूच्या नशेत दादागिरी करून अमोल संजय नेवारे (वय २४) याने आपला चारचौघात अपमान केला. त्यामुळेच त्याचा खून केल्याची कबुली आरोपी सिद्धार्थ खंडारे (वय २४, रा. सुदामनगरी) याने पोलिसांकडे दिली. मृत अमोल आणि आरोपी सिद्धार्थ या दोघांचेही हिलटॉप सुदामनगरीत शेजारीच घर आहे. अमोलचा भाऊ रणजित याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे अमोलही दारूच्या नशेत दादागिरी करायचा. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत तर्र होऊन मिरणवूकीत नाचत होते. एकमेकांसमोर आल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. अमोलने सिध्दार्थला मारहाण आणि शिवीगाळ केली. यावेळी अमोलचा भाऊ रणजित याने वाद सोडवला. दीड-दोन तासानंतर अमोल पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. जुने वैमनस्य आणि चार चौघात झालेला अपमान असह्य झाल्यामुळे सिद्धार्थ चिडला. रात्री ७.३०-८.०० सुमारास त्याला मद्रासी डेली निड्सच्या बाजूला अमोल अंधाऱ्या ठिकाणी एकटाच उभा दिसला. त्यामुळे सिद्धार्थने घरातून चाकू आणला आणि अमोलच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर सपासप घाव घातले. कंठ कापला गेल्यामुळे अमोल जागीच गतप्राण झाला. त्यानंतर आरोपी पळून गेला. रस्त्याचे बाजूला अमोलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बराच वेळ पडून होता. परिसरातील महिलांसह अमोलची वहिनी त्या रस्त्याने आली. तिला अमोल निपचित पडून दिसल्यामुळे तिने घरच्यांना सांगितले. अमोलला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमोलच्या परिवारात पत्नी योगिता आणि अडीच वर्षाचा अनिकेत नामक मुलगा आहे. (प्रतिनिधी) महिला पीएसआयने पकडला आरोपीअमोलच्या खुनामुळे सुदामनगरीत तणाव निर्माण झाला. रणजित नेवारे (वय २९) याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या भागात रात्रीपासून आरोपीचा शोध घेत होती. पीएसआय प्रशाली काळे यांना आरोपी सिद्धार्थ काटोलमध्ये दडून बसल्याची माहिती कळाली. त्यामुळे त्या आपल्या सहकाऱ्यांसह आज दुपारी काटोलमध्ये पोहचल्या. त्यांनी नातेवाईकाच्या घरी दडून बसलेल्या आरोपी सिद्धार्थच्या दुपारी ३ वाजता मुसक्या बांधल्या. त्याला नागपुरात आणण्यात आले. उद्या कोर्टात नेऊन त्याचा पीसीआर घेतला जाणार आहे.