शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सम्यकच्या अकाली एक्झिटने नागपूरच्या नाट्यसृष्टीत हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 22:47 IST

१५ व्या बालनाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाचे कसब दाखविणाऱ्या  बालनाट्य कलावंताची अकाली एक्झिट नाट्यसृष्टीत खळबळ माजवून गेली. सम्यक गजभिये असे बालकलावंताचे नाव असून, त्याने स्पर्धेत ‘बालभगत’ या नाटकात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले होते. परंतु स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक घेण्यासाठी सम्यक या जगातून निघून गेला होता. या गुणी कलावंताचे असे निघून जाणे त्यांच्या कुटुंबालाच नाही तर स्पर्धेसंबंधित साऱ्यांना रडवून गेले.

ठळक मुद्देअंगात भिनलेला ताप डोक्यात शिरला ---

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५ व्या बालनाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाचे कसब दाखविणाऱ्या  बालनाट्य कलावंताची अकाली एक्झिट नाट्यसृष्टीत खळबळ माजवून गेली. सम्यक गजभिये असे बालकलावंताचे नाव असून, त्याने स्पर्धेत ‘बालभगत’ या नाटकात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आकर्षित केले होते. परंतु स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक घेण्यासाठी सम्यक या जगातून निघून गेला होता. या गुणी कलावंताचे असे निघून जाणे त्यांच्या कुटुंबालाच नाही तर स्पर्धेसंबंधित साऱ्यांना रडवून गेले.बालनाट्य स्पर्धेत आठ दिवसांपूर्वी त्याने केलेल्या अभिनयाने सर्व प्रेक्षक भारावून गेले होते. हा मुलगा भविष्यात मोठे नाव कमावणार असे सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे साऱ्याचे लक्ष स्पर्धेच्या निकालाकडे होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. या स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळवणारा सम्यक गजभिये सोमवारी सकाळी निकाल लागला तेव्हा हे जग सोडून गेला होता. अंगात भिनलेला ताप डोक्यात जाण्याचे साधे निमित्त त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित १५ व्या बालनाट्य स्पर्धेत आठ दिवसांआधी ‘बालभगत’ या नाट्यातून आपल्या अभिनयाचे कसब दाखवत रसिकांची दाद मिळविली होती. हा १२ वर्षीय कलावंत शताब्दी चौकातील रमाईनगरात राहत होता. तो बिपीन कृष्णा शाळेचा सातवीचा विद्यार्थी होता. दोन दिवसापूर्वी त्याला ताप आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप डोक्यात शिरल्याने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. त्याच्यावर मानेवाडा स्मशानभूमीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.सम्यकने रमाई, डोंबारी, भट्टी या बालनाटकात भूमिका केल्या होत्या. राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या ‘विठाबाई’ मध्येही त्याची छोटी भूमिका होती. पाच वर्षांपूर्वी तो नाट्य कलावंत संजय जीवने आणि सांची जीवने यांच्या संपर्कात आला. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या नाटकात काम करू लागला. बालनाट्य स्पर्धेत बौद्ध रंगभूमीच्यावतीने ‘बालभगत’ नाट्य प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यात सम्यकने भगतसिंगच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाला रसिकांची दाद मिळाली होती.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर