सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार, तटकरेंची चौकशी होणार

By Admin | Updated: December 12, 2014 13:43 IST2014-12-12T12:35:31+5:302014-12-12T13:43:34+5:30

सिंचन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची चौकशी होणार आहे.

Ajit Pawar and Tatkare will be investigated for the irrigation scam | सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार, तटकरेंची चौकशी होणार

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार, तटकरेंची चौकशी होणार

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १२ - राज्यातील सिंचन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रिबंधक विभागाला (अँटी करप्शन ब्युरो) पवार व तटकरेंच्या चौकशीसाठी परवानगी दिली आहे. तसेच महाराष्ट्र सदन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुबळ यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 
विविध घोटाळ्यातील नेत्यांच्या चौकशीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली होती. सिंचन घोटाळाप्रकरणी पवार व तटकरे तर  महाराष्ट्र सदनप्रकरणी भुजबळ यांच्यावर आरोप झाले होते. या तिघांचीही चौकशी व्हावी अशी मागणीही होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी या फाईल्स क्लिअर करत नेत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दिला आहे. 
कुठल्याही चौकशीस तयार - तटकरे
आमची जी चौकशी करायची असेल ती करू दे, आपण कुठल्याही चौकशीस तयार आहोत, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली. या चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Ajit Pawar and Tatkare will be investigated for the irrigation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.