१५ फेब्रुवारीपासून पाडली जाईल अजनी रेल्वे स्थानकाची इमारत

By नरेश डोंगरे | Published: February 5, 2024 10:38 PM2024-02-05T22:38:56+5:302024-02-05T22:39:05+5:30

तिकिट काऊंटर आणि ऑफिस शिफ्टिंग : अस्थायी स्वरूपात जागा बदलली

Ajani railway station building will be demolished from February 15 | १५ फेब्रुवारीपासून पाडली जाईल अजनी रेल्वे स्थानकाची इमारत

१५ फेब्रुवारीपासून पाडली जाईल अजनी रेल्वे स्थानकाची इमारत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन वर्षांत वर्ल्ड क्लास दर्जाचे स्टेशन म्हणून उभी राहणारी सध्याची अजनी रेल्वे स्थानकाची ईमारत पुढच्या आठवड्यात पाडली जाणार आहे. या ईमारतीसोबतच अजनी मेट्रो स्थानकाच्या ईमारतीचा २० टक्के भागही पाडला जाणार आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस नव्या ईमारतीच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे.
अजनी स्थानकाच्या पश्चिमेला दुसऱ्या टर्मिनल बिल्डिंगच्या ग्राऊंड फ्लोअरचे काम तयार झाले आहे. फुट ओव्हर ब्रीजकरिता पाईिलंगचे काम सुरू आहे. तूर्त ही ईमारत तळ आणि तीन माळ्याची असणार आहे. भविष्यात आणखी सहा माळे त्यावर चढणार आहे. परिसरात सब पॉवर स्टेशनचे कामही केले जाणार आहे. सध्य स्थितीत अजनी स्थानकावर तीन फलाटं आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी चार फलाट बनविले जातील. दोन्ही ईमारती तयार झाल्यानंतर स्थानकाची प्रवासी क्षमता वाढून प्रतिदिवस ४४ हजार एवढी होणार आहे.

विशेष म्हणजे, अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम २०२३ मध्ये सुरू करण्यात आले असून ते मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.
-------

अजनीशी लिंक होणार मेट्रो स्टेशन
अजनी स्थानकाला मेट्रो स्टेशनसोबत लिंक करण्यासाठी मेट्रोच्या ईमारतीची तोडफोड करण्यात आली आहे. लिंक झाल्यानंतर प्रवासी खाली उतरून पायी नव्या स्थानकावर जाण्याऐवजी थेट मेट्रोतूनच अजनी स्थानकावर पोहचू शकतील.
-------

जुन्या वसाहतीच्या जागेवर नव्या सदनिका
या परिसरातील पश्चिम भागाला असलेले रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी वसाहतही पाडण्यात आली असून त्या जागेवर २८ सदिनकांची नवीन ईमारत उभी राहणार आहे. यातील एका ईमारतीचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण ध्यानात ठेवून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले आहे.
 

Web Title: Ajani railway station building will be demolished from February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर