हवी शुद्ध हवा!

By Admin | Updated: June 5, 2014 01:08 IST2014-06-05T01:08:00+5:302014-06-05T01:08:00+5:30

पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण.

Air purifier wanted! | हवी शुद्ध हवा!

हवी शुद्ध हवा!

पर्यावरण म्हणजे काय
पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा  परिणाम म्हणजे पर्यावरण.
वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे वायू प्रदूषणाचेही प्रश्न मोठय़ा शहरात निर्माण झाले आहेत. शहरातील काही भागातील हवा पोषक  असली तरी काही भागात मात्र तिच्यापासून धोका होण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहराच्या विविध भागात केलेल्या तपासणीतून हे  चित्र पुढे आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ठराविक कालावधीत शहरातील काही भागात तपासणी केली जाते. यंदाही विविध कालावधीत  सिव्हिल लाईन्स, उत्तर अंबाझरी मार्ग, हिंगणा मार्ग आणि  सदर भागातील काही निवासी भागात तपासणी करण्यात आली. सिव्हिल लाईन्सचा भाग  वगळता इतर भागात हवेत काही घटक प्रमाणाबाहेर आढळून आले आहेत. सिव्हिल लाईन्समध्ये आठवड्यातून सहा दिवस याप्रमाणे ५ ते ३१  मेदरम्यान एकूण २३ दिवस तपासणी करण्यात आली. त्यात  मंडळाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच चाचणीचे निष्कर्ष  होते. त्यातुलनेत हिंगणा  मार्गावरील स्थिती उलट होती. ५ एप्रिल ते ३0 एप्रिल या दरम्यान औद्योगिक वसाहती जवळील काही भागातील एकूण आठ दिवस हवेची तपासणी  करण्यात आली. उत्तर अंबाझरी मार्गावर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या  टेरेसवर चाचणी  घेण्यात आली.  या काळात काही दिवसांचे निष्कर्ष हे  समाधानकारक तर काही दिवसांचे निष्कर्ष हे  प्रमाणा बाहेर आढळून आले. हिंगणा मार्गावर औद्योगिक वसाहत असल्याने त्याचा परिणाम होतो. त्या  तुलनेत सिव्हिल लाईन्समध्ये हिरवळ अधिक आहे. शासकीय कार्यालये असल्याने मोकळी जागाही मोठय़ा प्रमामात आहे. त्यामुळे या भागात वायू  प्रदूषणाची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी ३५ लाखाच्या या शहरात नागरीकरण वाढतच राहिले तर शुद्ध हवेसाठी जागेची  शोधाशोधच करावी लागणार आहे.
औद्योगिक प्रदूषणात विदर्भ आघाडीवर
पुढील काही वर्षांंंंत प्रदूषणात विदर्भ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आघाडीवर राहण्याची चिन्हे आहेत. विदर्भात होऊ घातलेल्या १३२ ऊर्जा  प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. नियोजन न केल्यास वायू आणि जल प्रदूषणाचा स्तर वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त  केली.
विदर्भातील १३२ प्रकल्पांतून ८६ हजार मेगावॅट वीज निíमती होईल. सध्या १0 हजार मेगावॅटचे उत्पादन सुरू आहे. या प्रकल्पातील राख हवेत आणि  पाण्यात मिसळल्याने जनतेला गंभीर आजाराला सामोरे जावे लागेल, शिवाय या प्रकल्पातील पाणी तलाव आणि नद्यांमध्ये गेल्यास त्यातील जीवजंतू  मरतील आणि लोकांना दूषित पाणी मिळेल, असा पर्यावरण तज्ज्ञांचा अहवाल आहे.
पर्यावरण तज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी सांगितले की,  ऊर्जा प्रकल्पातून निघणारे २.५ मायक्रॉन इतक्या छोट्या घटकांना प्रदूषण मंडळाची उपकरणेही  पकडत नाहीत. हे घटक श्‍वासाद्वारे मानवाच्या शरीरात जातात. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाचे आणि कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.  डिसेंबर २0१३ च्या नागपूर अधिवेशनात नागपूर कॅन्सरची राजधानी होईल, असा अहवाल सादर करण्यात आला होता. रस्त्यांवरील डिझेल  वाहनांचीही हीच स्थिती आहे. याशिवाय १0 मायक्रॉनचे जड घटक जमीन आणि तलावातील पाण्यावर बसतात. अन्य स्वरूपात जनावरे तर पाण्यात  मासे त्याचे सेवन करतात, शिवाय पाणी जनतेच्या पिण्यासाठी वापरले जाते. कोराडीचे प्रदूषित पाणी कन्हान नदीत तर चंद्रपूरचे पाणी इराई नदीत  सोडले जाते. काही प्रकल्पाचे पाणी पुढे वैनगंगा नदीतही जाईल. नागपुरातील सांडपाणी गोसेखुर्दला जाऊन मिळते. वायूप्रमाणे जल शुद्धीकरण हे  महत्त्वाचे आहे.
 हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी पाऊस कमी होण्याचा संकेत आहे. विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांमुळे तापमान वाढेल.  अंबाझरी  तलावाचे पाणी दूषित झाले आहे. या तलावात वाडी, दत्तवाडी येथील सांडपाणी आणि हिंगणा एमआयडीसी येथील प्रदूषित पाणी सोडले जाते. तेच  पाणी प्रक्रियेविना सीआरपीएफ व एमआयडीसी येथील लोकांना पिण्यासाठी दिले जाते. गोरेवाडा तलावात एनआयटी ले-आऊटमधील सांडपाणी  प्रक्रियेविना सोडले जाते. यावर निर्बंंंंध हवे. नागपुरातून दररोज जवळपास ७00 टन कचरा निघतो. त्यात १00 टन जैविक असतो. हा कचरा  प्रक्रियेविना भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये ठेवला जातो. तो कचरा कुजल्याने त्यातून कार्बनडाय ऑक्साईडपेक्षा २७ पट विषारी मिथेन वायू निघतो. तो  ग्लोबल वार्मिंंंंगसाठी घातक आहे. त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले नागपूरकरांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. 
 

Web Title: Air purifier wanted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.