शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
2
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
3
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
4
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
5
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
6
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
7
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
8
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
9
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
10
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
11
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
12
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
13
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
14
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
15
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
16
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
17
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
18
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
19
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
20
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 8:08 PM

आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. महिला आयोगावर माझी नेमणूक झाली तेव्हा वास्तवाची जाण नसलेले लोक योजना तयार करत असत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, असा सवाल उपस्थित करतानाच छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी योजनाकारांनी ग्रासरुटवर जाऊन, वास्तवाची जाणीव करवून घेऊन योजना साकाराव्या असे आवाहन केले.

रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सहकार भारतीच्या द्वितीय महिला अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल उईके बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलपती शशी वंजारी, स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, सहकार भारतीच्या शताब्दी पांडे, रमेश वैद्य, उदय जोशी, संध्या कुळकर्णी, नीलिमा बावणे उपस्थित होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिला मेढे व सहकार भरतीच्या विजया भुसारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.वर्षानुवर्षे महिलांसाठीच्या योजना या एकसारख्याच बनत असत. महिलांना मदत म्हणून कुठवर शिलाई मशीनचेच वाटप करणार? याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना, या विचारप्रक्रियेत बदल घडविण्याचे आवाहन केले असता, त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आणि महिला जशा विचार करतात तशा योजना त्यांच्यासाठी अमलात आणण्याची सूचना आयोगाला केल्याचे उईके यांनी यावेळी सांगितले. त्यातूनच ‘आदिवासी सशक्त योजना’ सारखे उपक्रम सादर झाले आणि परिवर्तन घडायला लागले. सहकार भारतीने आदिवासी भागातही पोहोचावे आणि बस्तरसारख्या भागातील आदिवासी महिलांना या कामात जोडून घ्यावे. सहकार भारती ही संस्था भारतीय संस्कृतीची मूळभाषा बोलते. ते वास्तवातही उतरवण्याची किमया साधण्याचे आवाहन राज्यपाल अनसूया उईके यांनी यावेळी केले. संचालन रेवती शेंदुर्णीकर यांनी केले तर आभार नीलिमा बावणे यांनी मानले.

महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याची गरज - शांताक्कामहिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी समाजात काम करण्याची गरज आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार भारतीने काम करण्याची गरज आहे. स्त्री ही शक्तिस्वरुपा आहे आणि ती समाजात परिवर्तन घडवू शकते म्हणून महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याचे आवाहन शांताक्का यांनी यावेळी केले.राज्यपालांनी घेतले स्मारकाचे दर्शनउद्घाटनापूर्वी राज्यपाल अनसूया उईके यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. सहकार भारतीचे हे आयोजन महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे उईके यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर