‘एम्स’ची जागा ठरणार आज!

By admin | Published: August 23, 2014 03:08 AM2014-08-23T03:08:27+5:302014-08-23T03:08:27+5:30

नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली. ‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी बैठक बोलविण्यात आली आहे.

'AIIMS' will be in place today! | ‘एम्स’ची जागा ठरणार आज!

‘एम्स’ची जागा ठरणार आज!

Next

नागपूर : नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली. ‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, सचिव मनीषा म्हैस्कर व पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेचे सहसचिव संदीपकुमार नायक उपस्थित राहणार आहे. यावेळी नागपुरात ‘एम्स’ची जागा ठरण्याची दाट शक्यता आहे. कालपर्यंत एम्सच्या धर्तीवर मेडिकल, मेयोचा विकास असा शब्दप्रयोग लोकप्रतिनिधींकडून व्हायचा, मात्र विदर्भात एम्सची घोषणा झाल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत डॉक्टर-रुग्णाचे प्रमाण पाहिल्यास दोन हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आहे. हे प्रमाण हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असे आणण्यासाठी, आरोग्य क्षेत्रातील संशोधन वाढविण्यासाठी व उत्तम आरोग्य सेवा देणे ही एम्सचे कर्तव्य आहे.
यामुळे विदर्भातील आरोग्य क्षेत्रात बदल घडण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भोपाळ (मध्यप्रदेश), भुवनेश्वर (ओरिसा), जोधपूर (राजस्थान), पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगड) ऋषिकेश (उत्तराखंड) या नंतर आता विदर्भात एम्स होऊ घातले आहे. शनिवारी या संदर्भातील बैठक रविभवनात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'AIIMS' will be in place today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.