शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव

By दयानंद पाईकराव | Updated: June 13, 2025 07:53 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेला जाण्यासाठी यशा कामदार-मोढा, तिचा चिमुकला रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा हे गुरुवारी निघाले होते.

- दयानंद पाईकरावनागपूरनागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेला जाण्यासाठी यशा कामदार-मोढा, तिचा चिमुकला रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा हे गुरुवारी दुपारी विमानतळावर गेले. परंतु, काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांच्याकडे लंडनला जाण्यासाठी काही कागदपत्रं कमी होती. विमान कंपनीने त्यांना प्रवासाची परवानगीही नाकारली. यशाचे पती किशन त्यांना घरी परत नेण्यासाठी विमानतळावर आले. परंतु, ऐनवेळी यशाची सासू रक्षा यांनी एअर इंडिया कंपनीची समजूत घातल्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली अन् काही वेळातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. विमान कंपनी आपल्या अटी, शर्तींवर कायम राहिली असती, तर या तिघांचाही मृत्यू टळला असता.

यशा मनीष कामदार हिचे लग्न तीन वर्षांपूर्वी लंडनमधील किशन मोढा यांच्यासोबत झाले होते. लंडनमध्ये किशन मोढा यांचा फरसाणचा मोठा व्यवसाय होता. परंतु, नातेवाइक राहात असल्यामुळे आणि किशन यांच्या वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असल्यामुळे त्यांचे नेहमीच अहमदाबादला येणे-जाणे होते.  

सहा दिवसांनी येतो म्हणाले...यातच काही दिवसांपूर्वी मोढा कुटुंबीयांनी आपला लंडनमधील व्यवसाय बंद करून अहमदाबादमध्ये बायोमास पॅलेट फॅक्टरी म्हणजे कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्लान्ट सुरू केला होता. किशन मोढा यांचा व्यवसाय चांगला सुरू असताना महिनाभरापूर्वी त्यांच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. अहमदाबादमध्येच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. परंतु, इतकी वर्षे लंडनला राहिल्यामुळे तेथेही मोढा कुटुंबीयांचे नातेसंबंध निर्माण झाले होते.याच संबंधातून तेथील काही नागरिकांनी किशन यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित केली होती. याच शोकसभेला यशा, तिचा चिमुकला रुद्र आणि सासू रक्षा जात होते. परंतु, व्यवसायाच्या कारणामुळे यशाचे पती किशन यांनी मी पाच-सहा दिवसानंतर लंडनला येतो, असे सांगितल्याने तिघे लंडनला निघाले. त्यांचे विमान अवकाशात झेपावताच काही वेळातच त्यांच्या विमानाला अपघात होऊन काळाने त्यांच्यावर झडप घातली. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातnagpurनागपूर