कृषी कायदा शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:34 IST2020-10-04T00:33:15+5:302020-10-04T00:34:47+5:30
Rajiv Satav, agriculture Act कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे. कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

कृषी कायदा शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी कायदा हे देशभरातील शेतकऱ्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे.
कृषी कायद्याबाबत खासदार सातव केंद्र शासनावर टीका करून या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. दिल्लीला जात असताना त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी चर्चा केली. त्यांनी कृषी, कामगार कायदा आणि हाथरस प्रकरणाबाबत भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशात बेरोजगारी वाढली आहे. आता कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची अधोगती सुरू करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जीडीपीच्या आकडेवारीतून देशाच्या बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची कल्पना येते. शासनाकडे अर्थव्यवस्था चांगली करण्यासाठी काहीच योजना नाही. १२ कोटी नागरिक बेरोजगार आहेत. तर अडीच लाख शासकीय पदे रिक्त आहेत. दुसरीकडे शासन अर्ज करणाऱ्यांकडून १ हजार रुपये वसूल करीत आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर, प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण, शहर काँग्रेसचे महामंत्री रिंकू जैन उपस्थित होते.