नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केले घोषणाआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:23 IST2019-12-18T11:21:13+5:302019-12-18T11:23:06+5:30
२५ हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केले घोषणाआंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: : २५ हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
सरकारविरोधी घोषणा देत सदस्यांनी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.