शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्ससाठी एजंट देतो परीक्षा, अर्जदार होतो पास, तिघांविरूद्ध तक्रार

By सुमेध वाघमार | Updated: July 31, 2025 20:41 IST

आरटीओची कारवाई : लर्निंग लायसन्स रद्द

नागपूर : नागरिकांच्या सोयीसाठी आरटीओने सुरू केलेल्या 'फेसलेस' सेवेचा गैरवापर करून, काही एजंट्सनी लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षेची वेबसाईट हॅक केल्याचे उघड झाले आहे. नागपूर शहर आरटीओने कारवाई करत तीन व्यक्तींविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तसेच त्यांचे लर्निंग लायसन्स रद्द केले आहेत. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते.   

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करून आणि आॅनलाइन चाचणी देऊन उत्तीर्ण होणाºया उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे लर्निंग लायसन्स दिले जाते. ही सेवा आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपीच्या  माध्यमातून कार्यान्वित केली जाते. मात्र, काही दलाल या सुविधेचा गैरवापर करतात. ते आधार क्रमांकाचा वापर करून स्वत:च्या आणि अर्जदाराच्या नावाने दोन आॅनलाइन अर्ज करत. 'फेस आॅथेंटिकेशन' दरम्यान, हे एजंट्स कमांड पोर्टमध्ये जाऊन वेबसाईट कोडिंगमध्ये बदल करत होते, ज्यामुळे अर्जदाराऐवजी इतर कोणाचाही चेहरा प्रमाणित होता, त्यानंतर, वेबकॅमेºयावर बोट ठेवून एजंट स्वत:च परीक्षा देत लर्निंग लायसन्स मिळवत असत. हा 'साईट हॅक' करण्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, मात्र परिवहन विभागाने याकडे गांभीयार्ने पाहिले नव्हते. आता शहर आरटीओने तीन व्यक्तींविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्याने परिवहन विभाग यात काय सुधारणा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे पकडले तिघांनाशहर आरटीओचे सहायक मोटार वाहन निरीक्षक ध्वज दखणे यांनी संगणकीय प्रणालीवर 'फेसलेस' पद्धतीने लर्निंग लायसन्स काढलेल्या काही उमेदवारांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पडताळणी केली. यात असे आढळून आले की, या उमेदवारांनी स्वत: परीक्षा न देता त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी बाहेरील व्यक्तीस देऊन लायसन्स प्राप्त केले होते. 'ई-केवायसी फेसलेस' प्रणालीचा गैरवापर करून, कायद्याचे उल्लंघन करून आणि शासनाची फसवणूक करून लर्निंग लायसन्स प्राप्त केल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. 

बोगस लायसन्स काढल्यास पोलीसात तक्रार"आॅनलाईन फेसलेस प्रणालीचा गैरवापर करुन चाचणी न देता लर्निंग लायसन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करु नये. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. तसेच अशा प्रकारे लायसन्स काढल्याचे निदर्शनास आल्यास ते लायसन्स रद्द करण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल."-किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर