शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा कारभार प्रभारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST

मंगेश व्यवहारे नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाचे काम सांभाळणारे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे (बोर्ड) कामकाज प्रभारींच्या भरवशावर ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाचे काम सांभाळणारे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे (बोर्ड) कामकाज प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. गेल्या चार वर्षापासून नागपूर बोर्डाला कायमस्वरूपी अध्यक्षांची प्रतीक्षा आहे. नुकतेच बोर्डाचे सचिव रविकांत देशपांडे हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार होता. आता अध्यक्ष आणि सचिव ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असून, या दोन्ही पदांचा अतिरिक्त प्रभार इतर अधिकाऱ्यांना दिला आहे.

रविकांत देशपांडे निवृत्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज सोपविण्यात आला. अनिल पारधी यांच्याकडे मूळ जबाबदारी अमरावती बोर्डाच्या सचिव पदाची आहे. त्यांच्याकडे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यातच त्यांच्याकडे पुन्हा बोर्डाच्या अध्यक्षाचा प्रभार दिला आहे. नागपूर बोर्डामध्ये कार्यरत असलेल्या सहसचिव माधुरी सावरकर यांच्याकडे बोर्डाच्या सचिवपदाचा अतिरिक्त चार्ज दिला आहे. सहा जिल्ह्यांचा कारभार सांभाळणाऱ्या नागपूर बोर्डातून दरवर्षी साडेतीन लाखाच्या जवळपास विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देतात. परीक्षेच्या नियोजनाचे संपूर्ण कामकाज वर्षभर सुरूच असते. यंदा कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या नियोजनाची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही विभागीय सचिव देशपांडे यांनी बोर्डाचे कामकाज प्रभावीपणे पार पाडले. यंदा राज्यात नागपूर बोर्डाचे कामकाज अव्वल होते. त्यांनी साधारणत: ३ वर्षाच्या जवळपास बोर्डाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

२०१६ मध्ये बोर्डाचे अध्यक्ष संजय गणोरकर सेवानिवृत्त झाल्यानंतर, अध्यक्षाचा अतिरिक्त चार्ज पारधी यांच्याकडे आला. त्यांच्यानंतर देशपांडे यांनी अतिरिक्त अध्यक्ष म्हणून कामकाज बघितले. आता तर दोन्ही मुख्य पदे प्रभारींवर आहे.

- विभागातील शिक्षणाचा कारभारच प्रभारीवर

नागपूर बोर्डाचे अध्यक्ष व सचिव - प्रभारीवर

विभागीय शिक्षण उपसंचालक - प्रभारीवर

शिक्षणाधिकारी १२ पैकी ५ प्रभारीवर

उपशिक्षणाधिकारी २५ पैकी २० जागा रिक्त

गटशिक्षणाधिकारी ६३ पैकी ५३ जागा रिक्त

- नागपूर विभागात शिक्षण क्षेत्रात रिक्त पदाचा मोठा बॅकलॉग आहे. शिक्षण उपसंचालक, बोर्डाचे अध्यक्ष, शिक्षणाधिकारी ही पदे चारचार वर्षापासून प्रभारींच्या भरवशावर आहे. एकाएका अधिकाऱ्याकडे तीनतीन पदाचा पदभार आहे. अशी अवस्था असताना शिक्षकांचे आमदार म्हणून विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे हे अपयश आहे.

अनिल गोतमारे, जिल्हाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ