आठवडाभरानंतर मिळाले म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:18+5:302021-05-23T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले जात आहे. परंतु केंद्राकडून मात्र लसीचा साठाच ...

आठवडाभरानंतर मिळाले म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले जात आहे. परंतु केंद्राकडून मात्र लसीचा साठाच होत नाही. शुक्रवारीसुद्धा नागपूर जिल्ह्याला कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणतीही लस मिळाली नाही. तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस आजारावर वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा नागपूर जिल्ह्याला आठवडाभरानंतर प्राप्त झाला.
म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असणाऱ्या ॲम्फोटेरिसिन बी लिपीडच्या १३० व्हायल्स शनिवारी प्राप्त झाल्या आहेत. तर याच आजारावरील ॲम्फोटेरिसिन बी लायफोसोमलचे ६९६ व्हायल्स प्राप्त झाले आहेत. जिल्हास्तरीय समितीने लसीची उपलब्धता रुग्णांची गंभीरता लक्षात घेऊन वितरण केले आहे.
याासोबतच शनिवारी ६२ मेट्रिक टन ऑक्सिजन शहराला प्राप्त झाला. वितरण खासगी व शासकीय कोविड रुग्णालय व प्लांटसला करण्यात आले. तसेच १२४ रेमडेसिविर जिल्ह्याला प्राप्त झालेत.