शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फेरबदलानंतर ‘ते’ नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

By कमलेश वानखेडे | Updated: October 7, 2023 15:14 IST

वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळेबाजांचे सरकार

नागपूर : गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्यांना शुद्ध करून, गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. पण ‘डाग जरा जिद्दी है’ अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झालेली आहे. त्यांची नावे मी आता जाहीर करून शकत नाही. मात्र, मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतर हे नऊ मंत्री मंत्रीमंडळात नसतील, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये या भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावेच लागेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.

वडेट्टीवार म्हणाले, हे तीन जणांचे घोटाळे बाजांचे सरकार आहे. हे मंत्री पूर्णतः लुटमार करणारे आहेत. यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे यांना पंधरा दिवसांच्या आत काढावेच लागेल. नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनतेसमोर मांडल्या शिवाय राहणार नाही. या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत. तर भाजपनेच आरोप लावलेले आहेत. त्यांच्या नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेत किंवा चौकशी किंवा ईडी ने नोटीस बजावलेल्या आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलेसे आहे आणि त्याचा निरक्षणातून हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना एक मिनिट सुद्धा पदावर ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली. इंडियाच्या जागा वाटपाचे सूत्र दिल्लीतच ठरत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागवार पदाधिकांच्या बैठका घेणं सुरू केले आहे. १२ तारखेला त्याची बैठक नागपूर मध्ये होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

१६ आमदारांवर कारवाई होणारच

त्या आमदारांवरती कारवाई होणारच आहे. फक्त आजचं मरण उद्या वरती चालढकल चालली आहे. कायद्यातून कोणी वाचवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार नेहमीच नाराज असतात

- अजित पवार नेहमीच नाराज असतात. ही त्यांची ‘टॅक्टिस’ आहे. नेहमी नाराज असल्याचे दाखवणे आणि आपले वर्चस्व कायम करणे, हे त्यांचे कौशल्य आहे. ते आमच्या मंत्रिमंडळातही होते. तेव्हाही त्यांनी तेच केले. कधी नॉट रिचेबल, कधी स्विच ऑफ , तर कधी त्यांना ताप आलाय. हे सगळी राजकीय बिमारी असल्याचा चिमटा वडेट्टीवारांनी काढला

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा