शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल नऊ वर्षांनंतर नागपूर विमानतळ खासगीकरणाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२८ ला वित्तीय निविदा काढणार : निविदेसाठी पाच कंपन्या पात्र, सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ खासगी कंपनीकडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) माध्यमातून राबविण्यात येत आहे.जून २००६ मध्ये संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेडची नोंदणी झाली आणि आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएलने विमानतळ संचालनाची जबाबदारी सांभाळली. जवळपास आठ वर्षांनंतर गेल्या वर्षी आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन) निविदा काढण्यात आल्या. पूर्व प्रक्रियेत पात्र भागीदारांमध्ये जीव्हीके, जीएमआर, टाटा रियल्टी, एस्सेल इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा आदी कंपन्यांचा समावेश आहे. विमानतळाचा ताबा कुणाला मिळेल, हे निविदा काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.यापूर्वी विमानतळाच्या खासगीकरणासाठी अनेक प्रक्रिया झाल्या आहेत. २००९ मध्ये नागपूर विमानतळ एएआयकडून एमएडीसीकडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत विमानतळाचे खासगीकरण अडकले होते. नवीन सरकार आल्यानंतरही या प्रक्रियेला साडेचार वर्षे लागली. विमानतळ विकासासाठी निवड झालेली संबंधित कंपनी आणि एमआयएल यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. १६८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात निवड झालेल्या संबंधित कंपनीचे ७४ टक्के आणि एमआयएलची २६ टक्के भागीदारी राहील. खासगीकरणानंतर नागपूर विमानतळ सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर उभारण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विमानतळावर जवळपास २० विमाने राहण्याची क्षमता आहे. विकासानंतर त्याची क्षमता वाढणार आहे.अशी होतील विकास कामे 

  •  ७४ टक्के भागीदारीसह विमानतळाच्या विकासासाठी १६८५ कोटींची गुंतवणूक.
  •  दुसऱ्या धावपट्टीची उभारणी. पहिल्या टप्प्यात ३२०० मीटर आणि दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर वाढवून धावपट्टीची एकूण लांबी ४ हजार मीटर.
  •  नवीन धावपट्टीवर जगातील सर्वात मोठ्या ए-३०० या प्रवासी विमानाचे लॅण्डिंग.
  •  ६५ हजार चौरस फूट जागेत नवीन टर्मिनल बिल्डिंग, १६ नवीन पार्किंग बेज व अ‍ॅप्रॉन.
  •  नवीन एटीसी ब्लॉक, फायर स्टेशन आणि कार्गो इमारत.

निविदेनंतर प्रक्रियेला एक महिना लागणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाला निविदा काढल्यानंतर आणखी एक महिना लागणार आहे. २८ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या वित्तीय निविदेतून खासगीकरणाची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे निश्चित होणार आहे. पाच कंपन्या २८ रोजी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या वित्तीय निविदा एमआयएलच्या कार्यालयात सादर करणार आहे. त्याच दिवशी निविदा काढून सल्लागारांमार्फत छाननी होणार आहे. विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची निवड होणार आहे. त्यानंतरची प्रक्रिया किमान एक महिना चालणार आहे. त्यानंतरच विमानतळ विकासाची सूत्रे पात्र कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे.विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर