शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र

By योगेश पांडे | Updated: June 20, 2025 15:52 IST

आणीबाणीत मनमानी केल्याचा आरोप : भाजप मिसाबंदींचा करणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून भाजप नेत्यांकडून सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यात येत आहेत. मात्र आता भाजप नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्यवरदेखील टीकास्त्र सोडले आहे. आणीबाणीच्या कालावधीत संजय गांधी व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी देशात दहशत निर्माण करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास व नागपुरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावला.

शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. १९७५ मध्ये देशात लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होतील. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या हजारो लोकांना तुरुंगात टाकले होते, ज्यात विरोधी पक्षाचे नेतेही होते. आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. यात संजय गांधी यांची मोठी भूमिका होती. त्यांनी जबरदस्तीने देशातील अनेक अविवाहित तरुणांचीदेखील नसबंदी केली होती. कॉंग्रेसचे नेते आता संविधान बचावची भाषा करतात. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्षानेच आणीबाणीच्या काळात संविधानाची गळचेपी करण्याचे काम केले होते. नवीन पिढीपर्यंत कॉंग्रेसचा हा खरा चेहरा व आणीबाणीची दाहकता आणण्यावर आमचा भर असेल असेल तिवारी यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून २५ जून रोजी आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या मिसाबंदींचा सन्मान केला जाईल. हा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाची स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, मिलींद माने, विकास कुंभारे, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाRajiv Gandhiराजीव गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूnagpurनागपूर