शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

लॉकडाऊननंतर एसटीच्या प्रत्येक प्रवाशाचे होणार निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 1:26 PM

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘सॅनिटायझर युनिट’ झाले तयार आठ आगारांसह विभागीय कार्यालय, कार्यशाळेत लावणार

दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. एसटीच्या नागपूर विभागातील आठ आगार तसेच विभाग नियंत्रक कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेत हे युनिट लावण्यात येणार आहे.कोरोनामुळे एसटीत लॉक डाऊन करण्यात आले आहे. लॉक डाऊनच्या काळात सर्व एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांची काळजी घेण्यासाठी एसटी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. नागपुरातील विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. कार्यशाळेतील भाराचा वापर करून अवघ्या ३ हजार रुपयात हे युनिट तयार करण्यात आले आहे. यात १० सेकंदात व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे १० युनिट नागपूर विभागात तयार करण्यात येणार आहेत. हे युनिट गणेशपेठ बसस्थानक, वर्धमाननगर बसस्थानक, इमामवाडा आणि घाट रोड बसस्थानकावर लावण्यात येणार आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये काटोल, उमरेड, सावनेर, रामटेक बसस्थानक, विभागीय कार्यशाळा आणि विभाग नियंत्रक कार्यालयात लावण्यात येणार आहे. प्रवाशी बसस्थानकावर आल्यानंतर या युनिटमध्ये निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच बसमध्ये बसणार आहे. विभागीय कार्यशाळेत नियंत्रण समिती ३ चे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांच्या हस्ते या युनिटचा शुभारंभ करण्यात आला. हे युनिट साकारण्यासाठी यंत्र अभायंता संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती उईके, मुख्य तंत्रज्ञ गजभाये, सहाय्यक आबीद अंसारी, इलेक्ट्रिशियन डी. आर. इंगळे, वेल्डर राजु डहारे, सोनडवले, झेड. आर. इरफान यांनी महत्वाची भामिका बजावली. लॉकडाऊन संपल्यानंतर एसटीच्या प्रवाशांसाठी प्रशासनाने हे युनिट तयार केल्यामुळे आता प्रवासी बिनधास्त एसटी बसने प्रवास करू शकणार आहेत.

 

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस