बिस्कीट खाल्ल्यानंतर युग झाला बेशुद्ध
By Admin | Updated: September 8, 2014 02:17 IST2014-09-08T02:17:30+5:302014-09-08T02:17:30+5:30
वाट न पाहता तो युगला घेऊन बाईकने निघाला. राजेशच्या घरून निघताच भूक लागल्याने युग घरी सोडण्यासाठी जिद्द करू लागला.

बिस्कीट खाल्ल्यानंतर युग झाला बेशुद्ध
नागपूर : वाट न पाहता तो युगला घेऊन बाईकने निघाला. राजेशच्या घरून निघताच भूक लागल्याने युग घरी सोडण्यासाठी जिद्द करू लागला. त्यामुळे राजेशने त्याला आपल्याजवळचे काही बिस्कीट खायला दिले. बिस्कीट खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला घेऊन ते लोणखैरीत गेले. तिथे त्याचा गळा दाबून खून केला आणि परत आले. घरी परतताच राजेशला डॉ. चांडकचे नातेवाईक आणि कर्मचारी लकडगंज ठाण्यात घेऊन आले.
आईचेच संस्कार
राजेशवर त्याच्या आईच्या संस्काराने प्रभावित असल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील धन्नालाल मजुरी करतात. राजेशची आई पूर्वी विमा एजंट होती. तिच्या इशाऱ्यावरून तो आपल्या वडिलांनाही मारहाण करायचा. अपहरणासाठी वापरलेली स्कुटी ही त्याच्या आईचीच भेट आहे. राजेशच्या ऐशोआरामाची तिला संपूर्ण माहिती होती. महिनाभरापूर्वी तो आपल्या प्रेयसीला घेऊन मामाच्या गावाला गेला होता. याची माहितीसुद्धा तिला होती. युगच्या घरीसुद्धा फोन केला होता
युगचे अपहरण करण्यापूर्वी राजेशने डॉ. चांडक यांच्या निवासस्थानी आणि क्लिनिकमध्ये फोन केला होता. सूत्रानुसार राजेशने अगोदर घरी फोन केला. मोलकरणीने फोन उचलला तेव्हा युग शाळेतून परतला किंवा नाही, हे जाणून घेतले. (प्रतिनिधी)