नागपुरात 'सीएए'विरुद्ध वकिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:32 IST2020-01-02T00:31:27+5:302020-01-02T00:32:22+5:30
जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

नागपुरात 'सीएए'विरुद्ध वकिलांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा न्यायालयातील वकिलांनी बुधवारी ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरुद्ध आंदोलन केले. दरम्यान, केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देऊन हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्र सरकार धर्माच्या नावावर देशाची विभागणी करीत आहे. हे दोन्ही कायदे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. अल्पसंख्यांकांना त्रास देण्यासाठी हे कायदे आणण्यात आले आहेत. त्याचे पडसाद देशात उमटले आहेत. हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशात अनेकतेमध्ये एकता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का पोहचायला नको. केंद्र सरकार असे प्रयत्न करीत असेल तर, त्याचा विरोध केला जाईल असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड. अक्षय समर्थ यांनी सांगितले. आंदोलनात सुमारे ५० वकील सहभागी झाले होते.