भीमा कोरेगावप्रकरणी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 09:50 IST2018-06-06T09:50:23+5:302018-06-06T09:50:34+5:30
भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना आज भल्या सकाळी पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.

भीमा कोरेगावप्रकरणी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना अटक
ठळक मुद्देनक्षलवाद्यांचे वकील म्हणून ओळख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना आज भल्या सकाळी पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. गडलिंग यांच्यासोबत सुधीर ढवळे व शोमा सेन यांनाही अटक केल्याचे वृत्त आहे. एल्गार परिषदेत प्रक्षोभग भाषणे करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी यापूर्वी त्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यात गडलिंग यांच्या घराचीही झडती घेण्यात येऊन काही दस्तावेज, पेनड्राईव्ह, सीडी, डिव्हीडी व हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. आज सकाळी जरिपटका येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.