शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

गृहविलगीकरणातील रुग्णांची रेमडेसिवीरसाठी भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. मनपा ...

गृहविलगीकरणातील रुग्णांची रेमडेसिवीरसाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. मनपा प्रशासनाने बेड मिळण्यासाठी मदत कक्षाचा ०७१२-२५६७०२१ क्रमांक दिला असला तरी याचा रुग्णांना कोणताही लाभ होताना दिसत नाही. या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर प्रतिसाद मिळत नाही. अशीच अवस्था कोविड रुग्णालयांची आहे. साइटवर उपलब्ध माहितीनुसार खाली बेडसाठी रुग्णांचे नातेवाईक संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधतात. परंतु प्रतिसाद मिळत नाही. तासनतास फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. अखेर त्रस्त रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला गाडीत टाकून शहरातील हॉस्टिलमध्ये भटकंती करतात. दुर्दैवाने हॉस्टिलमध्ये पोहोचल्यावरही बेड मिळत नाही.

जरीपटका येथील रहिवासी कपिल आपल्या वडिलांना बेड मिळावा यासाठी गुरुवारी सकाळी प्रयत्न करीत होते. त्यांनी मनपाच्या कोरोना वॉर रूमच्या मदत कक्षाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर कपिल आपल्या वडिलांना घेऊन मनपाच्या पाचपावली रुग्णालयात पोहोचला. परंतु बेड नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मेयो, मेडिकल व काही खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु बेड मिळाला नाही. मनपाच्या वेबसाइटनुसार मदर अ‍ॅण्ड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये तीन बेड खाली होते. परंतु या हॉस्पिटलचा फोन उचलत नव्हते. तसेच जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू झाल्याची माहिती मिळाली. या हॉस्पिटलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

......

गृहविलगीकरणातील रुग्णांना रेमडेसिविर नाही

जिल्हा प्रशासनाने औषध दुकानांना रेमडेसिविरच्या विक्रीला बंदी घातली आहे. फक्त कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रुग्णालयात बेड मिळत नसल्याने अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. डॉक्टर त्यांना रेमडेसिविर लिहून देतात. परंतु औषध दुकानातून त्यांना ते मिळत नाही. प्रसारमाध्यमातील गिरीश झुनके आपल्या वडिलांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी भटकंती करीत आहेत; परंतु ते त्यांना मिळाले नाही.

.........

रुग्णांना मृत्यूसाठी सोडले

एनजीओ अ‍ॅक्शन कमिटीचे सचिन बिसेन व सहकारी परिचित रुग्णांच्या मदतीसाठी औषध व बेडसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु बेड उपलब्ध होत नाही. रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णांना मृत्यूसाठी वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप त्यांनी केला.