आदित्य ठाकरेंनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:15 IST2018-07-18T22:14:21+5:302018-07-18T22:15:47+5:30

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाचे कामकाज अनुभवले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी विधानसभा व विधान परिषदेत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.

Aditya Thakare experienced Legislative assembly work | आदित्य ठाकरेंनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज

आदित्य ठाकरेंनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज

ठळक मुद्देपत्रकारांशी बोलणे टाळले


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाचे कामकाज अनुभवले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी विधानसभा व विधान परिषदेत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. परिसरातील शिवसेनेच्या कार्यालयाला भेट देऊन, शिवसेनेचे आमदार, मंत्री यांचीही भेट घेतली. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निघताना एमआयएमचे आमदार वारिस पठान व इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटोही घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी गर्दी करीत होते. शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार, छायाचित्रकार व शिवसैनिकांनी खूप गर्दी केल्याने आदित्य ठाकरे यांना कार्यालयातून लवकरच निघून जावे लागले.

Web Title: Aditya Thakare experienced Legislative assembly work