अजनीवन वाचविण्यासाठी शिवसैनिकांचे आदित्य ठाकरेंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:00+5:302021-01-13T04:20:00+5:30

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे अजनी काॅलनी परिसरात प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी येथील ७००० च्यावर झाडे कापली जाणार ...

Aditya Thackeray to Shiv Sainiks to save Ajniwan | अजनीवन वाचविण्यासाठी शिवसैनिकांचे आदित्य ठाकरेंना साकडे

अजनीवन वाचविण्यासाठी शिवसैनिकांचे आदित्य ठाकरेंना साकडे

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे अजनी काॅलनी परिसरात प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी येथील ७००० च्यावर झाडे कापली जाणार आहेत. ही पर्यावरणाची माेठी हानी आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन हा प्रकल्प थांबवावा आणि अजनीवन वाचवावे, अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

युवासेनेतर्फे याबाबत राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना निवेदन सादर केले. युवासेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे यांनी सांगितले, नागपूर शहरात फार थाेड्या ठिकाणी वनसंपदा शिल्लक आहे. त्यातील अजनीवन हेही एक आहे. प्रकल्पासाठी ५५ एकरच्या पहिल्याच टप्प्यात ७००० हजारावर वृक्षताेड केली जाइल. हा पूर्ण प्रकल्प ४४० एकरावर असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी आणखी हजाराे झाडे कापली जातील. नागपूरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानी नुकसानकारक आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबइतील आरेची वनसंपदा वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूरकरांनाही शुद्ध हवा पाहिजे आहे, त्यामुळे त्यांनी नागपूरकरांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हाेणारी वृक्षताेड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवासेनेचे शहर समन्वयक तुषार काेल्हे व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.

वाॅक फाॅर रेल्वे मेन्स आज

अजनी माॅडेल स्टेशन प्रकल्पात रेल्वे मेन्स शाळाही ताेडली जात असल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये असंताेष आहे. त्यामुळे शाळा वाचविण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने माेहीम राबविली जात आहे. रविवारी सकाळी ११ वाजता माजी विद्यार्थ्यांकडून वाॅक फाॅर नेचर, वाॅक फाॅर अवर स्कूल हे अभियान राबविले जात आहे. वृक्षप्रेमी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये येऊन आपला विराेध दर्शवावा, असे आवाहन अनिकेत कुत्तरमारे यांनी केले आहे.

जाणून घ्या अजनीतील जैवसंपदा

अजनीतील वृक्षताेड थांबविण्यासाठी तरुणांच्या एका ग्रुपतर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरराेज रस्त्यावर बॅनर घेऊन लाेकांना जागृत केले जात आहे. या माेहिमेंतर्गत रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान निषेध आंदाेलन केल्यानंतर अजनीतील वनसंपदेची विस्तृत माहिती जैवविविधता अभ्यासक प्राची माहुरकर या देणार आहेत. यानंतर पर्यावरण अभ्यासक जुई पांढरीपांडे या पर्यावरणपूरक इकाेब्रिक्स तयार करण्याचे तंत्र सांगणार आहेत. कुणाल माैर्य यांनी ही माहिती दिली.

Web Title: Aditya Thackeray to Shiv Sainiks to save Ajniwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.