अमरावती रोडवरील उड्डाणपूलाच्या उभारणीला लागणार सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी
By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 16, 2023 21:17 IST2023-11-16T21:17:08+5:302023-11-16T21:17:24+5:30
गुंतवणूक ७ कोटींनी वाढणार : १३२ केव्ही लाइनची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठविला

अमरावती रोडवरील उड्डाणपूलाच्या उभारणीला लागणार सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी
नागपूर : अमरावती रोडवरील ब्लॅक स्पॉट संपविणे आणि आणि वाहतूक वेगवान करण्याच्या उद्देशाने तसेच लोकांच्या सुविधांसाठी बनविण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाच्या उभारणीला आता सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्पाचा खर्च ७ कोटींनी वाढून ४७८ कोटींहून ४८५ कोटींवर जाणार आहे.
४.७९ किमीच्या दोन उड्डाणपूल प्रकल्पाचे बांधकाम मार्च २०२२ पासून सुरू आहे. आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशीरा मिळाल्याने बांधकामाला उशीर झाला. याशिवाय वाडी नाका ते पोलीस ठाण्यापर्यंत बनणाऱ्या उड्डाणपूलात १३२ केव्हीची लाइनची उंची वाढल्याने काम उशीरा होत आहे. आता कंत्राटदार कंपनीतर्फे कामाला सहा महिन्यांचा विस्तार देण्याच्या मागणीसह प्रस्ताव दिला आहे. दिवाळीमुळे सुट्ट्यांवर गेलेले कामगार अजूनही परतलेले नाहीत. सध्या आरटीओ ते विद्यापीठ परिसराच्या भागातील काम थंडबस्त्यात आहे.
बांधकामाची वैशिष्ट्ये :
आरटीओ कार्यालय ते वाडीपर्यंतच्या जवळपास ५ किमीच्या भागात वाहतुकदारांना पाच सिग्नलपासून सुटकारा मिळेल.
चार ब्लॅक स्पॉट संपुष्टात येतील.
उड्डाणपूलावर वाहनांसाठी ८० किमी प्रतितास गतीला परवानगी राहील.