शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:22 IST

वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित मोटार वाहन विधेयक लागू : विना परवाना वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास व दारू पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की भ्रष्टाचार फोफावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केला आहे. केंद्राचा हा कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे. यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जबर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. परंतु त्याचवेळी दंडाची रक्कम हजाराच्या घरात गेल्याने नियमांचे उल्लंघन करून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. शिवाय, भ्रष्टाचारात वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नागपुरात गणेश आगमनासोबत नव्या नियमांना घेऊन कारवाईचा श्रीगणेशा होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना शिक्षापूर्वी अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद होती. परंतु आता नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पूर्वी दारू पिऊन वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड होता आता तो १० हजारावर गेला आहे.ट्रिपल सिटला २ हजाराचा दंड‘ट्रिपल सिट’ बसवून दुचाकी दामटणाऱ्यांना आता खिशात २ हजार रुपये ठेवावे लागणार आहे. पूर्वी हा दंड केवळ १०० रुपये होता. तसेच पूर्वी सिग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यावर १०० रुपये दंड होता आता तो ५०० रुपये करण्यात आला आहे. सिटबेल्ट न बांधणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार १ हजार रुपये, विना विमा वाहन चालविणे २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.असा आहे दंड

  • हेल्मेट न घातल्यास -१००० रु.
  • सिग्नल तोडल्यास -५०० रु.
  •  लायसन्स नसताना वाहन चालविल्यास -५००० रु.
  •  वेगाने वाहन चालविल्यास -५०००रु.
  •  झिकझॅक पद्धतीने वाहन चालविल्यास -५०००रु.
  • दारू पिऊन वाहन चालविल्यास -१०,०००रु.
  •  दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जणांना बसविल्यास -२०००रु.
  •  रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास -१०,०००रु.
  • विमा नसताना वाहन चालविल्यास -२०००रु.
  • वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास -५०००रु.
  •  मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास -२०,००० रु.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर