शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या - नितीन गडकरी

By आनंद डेकाटे | Updated: November 18, 2023 18:01 IST

महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठात आढावा बैठक

नागपूर : पारंपारिक शेती सोबत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ सभागृह येथे शनिवारी आढावा बैठक आयोजिन करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अनिल बोंडे, आ. आशिष जैयस्वाल, वसंत खंडेलवाल, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील, सहाय्यक आयुक्त रविंद्र वायडा, प्रादेशिक उपायुक्त सुनिल जांभुळे, सुरेश भारती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आदी यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, मामा तलाव व मालगुजारी तलावामध्ये झिंगा पालन करुन मत्स्य व्यवसायमध्ये वाढ करता येईल. खारपाणपट्यात कोळंबी शेती करुन मत्स्य व्यवसायाला चालना द्यावी. शेतकऱ्यांनी मत्सव्यवसाय करण्यावर भर दिल्यास उत्पादनात वाढ होईल व यासाठी ॲक्वा एक्सचेंज ही युएसबेस कंपनी ची मदत होईल, त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

पूर्व विदर्भात ६ हजार गोड्या पाण्याचे क्षेत्र आहे तसेच पश्चिम विदर्भात खारपाणपट्टा आहे. या खाऱ्या पाण्याचा उपयोग करुन तेथे निवडक प्रजातीच्या वाढीसाठी मत्स्यपालन क्षमता निर्माण करुन कोळंबी क्षेत्र विकसित करता येईल.मत्स्य व्यवसायाकरिता मामा तलाव जिल्हा परिषदेमार्फत ठेक्याणे देण्यात आले. मामा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असून मत्स्य व्यवसाय उपयुक्त होण्यासाठी मामा तलावाचे खोलीकरण करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

गोड्या पाण्यात ‘झिंगा पालन’ क्षेत्र विकसित करता येईल. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील खारपाण पट्टयामध्ये खाऱ्या पाण्यातील सिंचन उत्पादन करण्याकरिता शासनाच्यावतीने सहकार्य करता येईल. खोल समुद्रातील मासेमारीसाठी नौका नुतनीकरण करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने लवकरच योजना तयार करण्यात येईल. असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarketबाजारVidarbhaविदर्भSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार