विजय राज यांनी अर्ज मागे घेतला; विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 08:41 PM2021-09-28T20:41:02+5:302021-09-28T20:41:45+5:30

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाचा एफआयआर व संबंधित खटला रद्द करण्यास नकार दिल्यानंतर प्रसिद्ध विनोदी अभिनेता विजय राज यांनी मंगळवारी यासंदर्भातील अर्ज मागे घेतला.

Actor Vijay Raj withdrew his application; Case of molestation | विजय राज यांनी अर्ज मागे घेतला; विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याचे प्रकरण

विजय राज यांनी अर्ज मागे घेतला; विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्याचे प्रकरण

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाचा एफआयआर व संबंधित खटला रद्द करण्यास नकार दिल्यानंतर प्रसिद्ध विनोदी अभिनेता विजय राज यांनी मंगळवारी यासंदर्भातील अर्ज मागे घेतला. (Actor Vijay Raj withdrew his application; Case of molestation)

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी विजय राजसह इतर कलावंत व कर्मचारी गोंदिया येथे आले होते. दरम्यान, ते काही दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी राज यांनी एका सहकारी तरुणीची छेड काढली, असा आरोप आहे. त्या तरुणीच्या तक्रारीवरून ३ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील रामनगर पोलिसांनी राज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला, तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण करून १२ डिसेंबर रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Web Title: Actor Vijay Raj withdrew his application; Case of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app