भरधाव स्प्लेंडरच्या धडकेत अ‍ॅक्टीव्हास्वार गंभीर

By दयानंद पाईकराव | Updated: December 28, 2023 13:56 IST2023-12-28T13:55:54+5:302023-12-28T13:56:19+5:30

आशिष खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर मेडिकल चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Activa driver serious in collision with Splendor in nagpur | भरधाव स्प्लेंडरच्या धडकेत अ‍ॅक्टीव्हास्वार गंभीर

भरधाव स्प्लेंडरच्या धडकेत अ‍ॅक्टीव्हास्वार गंभीर

नागपूर : भरधाव स्प्लेंडरने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिल्यामुळे अ‍ॅक्टीव्हावरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

आशिष अनिल भगत (वय ३५, रा. रामबाग) हे त्यांची अ‍ॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, ए. डी-११५२ ने रामबाग येथील एचएमडी टेलर्सच्या दुकानासमोरून जात होते. तेवढ्यात स्प्लेंडर क्रमांक एम. एच. ३१, बी. एल-८१०६ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आशिषच्या अ‍ॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली. यात आशिष खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर मेडिकल चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी आशिषचा चुलत भाऊ अमित जीवन भगत (वय ३६) याने बुधवारी २७ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी स्प्लेंडर चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ४२७ सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Activa driver serious in collision with Splendor in nagpur