श्री राम सेलिब्रेशनच्या अनधिकृत सभागृहावर नासुप्रची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:06 IST2019-07-03T22:04:58+5:302019-07-03T22:06:19+5:30
मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जूनदरम्यान या ठिकाणी नासुप्रतर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते, तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी बुधवारी कारवाई करण्यात आली.

श्री राम सेलिब्रेशनच्या अनधिकृत सभागृहावर नासुप्रची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जूनदरम्यान या ठिकाणी नासुप्रतर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते, तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी बुधवारी कारवाई करण्यात आली.
सभागृहाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्रतर्फे आज, गुरुवारीदेखील अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. इमारतीच्या पूर्वेकडे मंदिर असल्यामुळे या इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडे भूखंड क्रमांक १८ च्या बाजूला राहते घर असल्यामुळे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे, इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. इमारतीचा हा भाग लाडीकर यांनी तो स्वत: तोडून टाकायचा होता. मात्र तसे न करता व नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी न घेता लाडीकर यांनी तुटलेला भाग काढून तिथे नव्याने भिंत बांधून पुन्हा अवैध बांधकाम केले. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्रतर्फे कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहायक अभियंता श्रेणी-२ संदीप राऊत, क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.