वाठोड्यात विरोधाला न जुमानता कारवाई : ३८० अतिक्रमण हटविले()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:07+5:302021-02-09T04:10:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी वाठोडा चौकात विरोधाला न जुमानता अतिक्रमणावर कारवाई केली. पथक पोहोचताच ...

Action taken despite opposition in Vathoda: 380 encroachments removed () | वाठोड्यात विरोधाला न जुमानता कारवाई : ३८० अतिक्रमण हटविले()

वाठोड्यात विरोधाला न जुमानता कारवाई : ३८० अतिक्रमण हटविले()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी वाठोडा चौकात विरोधाला न जुमानता अतिक्रमणावर कारवाई केली. पथक पोहोचताच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ केली. अखेर पोलीस बंदोबस्तात ५४ अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपाच्या आठ झोनमध्ये ३८० अतिक्रमणे हटविण्यात आली.

नेहरू नगर झोनमधील वाठोडा ले-आऊट, श्रावणनगर येथील प्रमोद शेंडे यांच्या घरासमोर उभारण्यात आलेला ओटा तोडण्यात आला. त्यानंतर वाठोडा दहन घाट ते खरबी चौक, हसनबाग चौक दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमण व रस्त्यालगचे ठेले व अन्य दुकाने हटविण्यात आली. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले. लक्षीनगर झोन क्षेत्रातील आयटी पार्क चौक ते जयताळा बाजारपर्यंतच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंची फूटपाथवरील ५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले. धरमपेठ झोनच्या पथकाने रामनगर चौक ते सदर दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रणे हटविली. अवैध होर्डिंग व बॅनर हटविण्यात आले. हनुमाननगर झोन क्षेत्रातील मानेवाडा चौक ते उदयनगर चौक दरम्यानच्या मार्गावरील अतिक्रमणे हटविली. सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर चौक ते जुना मोटार स्टँड चौक, शहीद चौन ते टांगा स्टँड चौक दरम्यानची ६० अतिक्रमणे काढली.

लकडगंज झोनच्या पथकाने दानागंज चौक ते संभावना चौक, एचबी टाऊन चौक ते पारडी दरम्यान ५४ अतिक्रमणांचा सफाया करून ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या पथकाने रानी दुर्गावती चौक ते जाधवनगर दरम्यानची ४५ अतिक्रमणे हटविली. मंगळवारी झोन क्षेत्रातील झिंगाबाई टाकळी, अवस्थीनगर चौक ते जाफरनगर, शारदा चौक ते परत फरस चौक ते झिंगाबाई टाकळी दरम्यानची ५५ अतिक्रमणे हटविली. या दरम्यान फूटपाथवरील ५ अनधिकृत शेड तोडण्यात आले. ११ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Action taken despite opposition in Vathoda: 380 encroachments removed ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.