खवल्या मांजरांची तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:07+5:302020-12-15T04:26:07+5:30
नागपूर : राज्यातील खवल्या मांजरांची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग विशेष ॲक्शन प्लॅन राबविणार आहे. त्यासाठी कृती आराखडा आखला जाणार असून ...

खवल्या मांजरांची तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन
नागपूर : राज्यातील खवल्या मांजरांची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग विशेष ॲक्शन प्लॅन राबविणार आहे. त्यासाठी कृती आराखडा आखला जाणार असून त्याच्या अहवालानंतर पुढील तीन महिन्यात राज्यात तो राबविला जाणार आहे.
खवल्या मांजर हा दुर्मिळ प्रजातीचा प्राणी असल्याची वनविभागाकडे नोंद आहे. राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात हा प्राणी आढळतो. त्यामुळे त्याच्या तस्करीचे आणि शिकारीचे प्रमाणही याच भागात अधिक आढळते. या संदर्भात प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर म्हणाले, या प्राण्याच्या शिकारी केवळ मांस खाण्यासाठी होतात की यामागे संघटित तस्करांची टोळी आहे, याचा अभ्यास करणे हे वनविभागासमोरील महत्त्वाचे काम आहे. आंतरराष्ट्रीय प्राणी बाजारपेठेत खवल्या मांजराला अधिक मागणी आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. हा प्राणी आकारमानाने आणि शरीराने वेगळा आहे. म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय प्राणी बाजारपेठेत मागणी अधिक आहे. त्याच्या तस्करीची कारणे तज्ज्ञांच्या अभ्यासगटांकडून शोधली जाणार आहेत.
...
शिकारीच्या घटना उघडकीस
नागपूर जिल्ह्यात खवल्या मांजराच्या शिकारीच्या घटना मागील काळात उघडकीस आल्या आहेत. १९ मे रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या पथकाने शिजवायला घातलेल्या मांसासह दोन आरोपींनी अटक केली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पकडलेल्या खवल्या मांजराला वनविभागाच्या पथकाने मुक्त केले होते.
शिकारीच्या घटनांसोबतच तस्करी अलीकडे वाढत आहे, हे चिंताजनक आहे. यामागे संघटित गुन्हेगारी आहे का, याचा शोध वनविभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आराखडा तयार होताच तातडीने ही योजना राज्यात राबविली जाईल.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
...