नागपुरातील मी मराठी खानावळीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:05 IST2020-03-13T21:02:34+5:302020-03-13T21:05:17+5:30
माता कचेरीनजीक असलेली ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले.

नागपुरातील मी मराठी खानावळीवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माता कचेरीनजीक असलेली ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले.
या खानावळीचे संचालक भूषण मुरारकर आहेत. यासंदर्भात त्यांना २६ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५५ अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु त्यांनी नोटिशीकडे दुर्लक्ष केले. अखेर या हॉटेलवर शुक्रवारी मनपाचा बुलडोझर चालला आणि संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्या मार्गदर्शनात अभियंता राजू फाले, कृष्णा कोल्हे तसेच अग्निशमन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.