खाना खजानासह, इंडियन ग्रीलसह अनेक ठिकाणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:02+5:302020-12-30T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जरीपटक्यातील हॉटेल इंडियन ग्रील, यशोधरानगरातील हॉटेल खाना ...

खाना खजानासह, इंडियन ग्रीलसह अनेक ठिकाणी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जरीपटक्यातील हॉटेल इंडियन ग्रील, यशोधरानगरातील हॉटेल खाना खजानासह विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम राबवून अवैध दारूगुत्ते तसेच हातठेल्यावर अंडा-आमलेट आणि चायनीज सेंटर चालविणाऱ्या ७४ आरोपींवर कारवाई केली. याच दरम्यान पोलिसांनी कामठीतील गांजा तस्कर आमिर ऊर्फ गोलू बब्बा शेर खान याच्याही मुसक्या बांधल्या. या मोहिमेत पोलिसांनी १६.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील अनेक हातठेल्यावर अंडा-आमलेट तसेच चायनीजच्या नावाखाली अवैध दारू विक्री होते. अशा सर्वांवर कारवाई करण्यासाठी २० ते २६ डिसेंबरला शहरभर मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार १३५४ ठिकाणी तपासणी करून ७० ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली. ६९ ठिकाणी नाकेबंदी करून संशयितांची तपासणी करण्यात आली.