शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चार मंगल कार्यालयावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी केली ८८ सभागृहांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका प्रशासनाने लग्न ...

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी केली ८८ सभागृहांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका प्रशासनाने लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी शहरातील चार मंगल कार्यालयावर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच सर्व झोनमधील ८८ सभागृहांची तपासणी करण्यात आली. आयुक्तांच्या निर्देशानुसार पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

नेहरूनगर झोनअंतर्गत म्हाळगीनगर चौकातील बेसा पॉवर हाऊसजवळील एम्पोरियम हॉल, लकडगंज झोनअंतर्गत वर्धमाननगर येथील सात वचन लॉन, आसीनगर झोनमधील पॉवरग्रीड चौकातील जगत सेलिब्रेशन लॉन व मंगळवारी झोनमधील गोधनी रोडवरील गोविंद लॉनवर कारवाई करण्यात आली. निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्याने दंड वसूल करण्यात आला. यापैकी एम्पोरियम हॉल व जगत सेलिब्रेशन लॉनकडून प्रत्येकी १५ हजार रुपये दंड तात्काळ वसूल करण्यात आला.

सात वचन लॉन कार्यालय बंद असल्याने त्यांना १५ हजार दंडाची नोटीस बजावली. तर गोधनी मार्गावरील गोविंद लॉनकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला.

याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील १०, धरमपेठ १४, हनुमाननगर ९, धंतोली ११, नेहरूनगर ९, गांधीबाग ५, सतरंजीपुरा ४, लकडगंज ८, आसीनगर ८ व मंगळवारी झोनमधील १० अशा एकूण ८८ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली.