ई-रिक्षांवर कारवाई
By Admin | Updated: August 8, 2014 01:07 IST2014-08-08T01:07:31+5:302014-08-08T01:07:31+5:30
शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई- रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,

ई-रिक्षांवर कारवाई
नागपूर- शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई- रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, विदर्भ आॅटोरिक्षाचालक फेडरेशननेही नियमबाह्य धावत असलेल्या या ई-रिक्षांवर कारवाईची मागणी केली आहे.
प्रथमदर्शनी या ई-रिक्षा वाहतूक आणि नागरिकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना तातडीने थांबविण्यात यावे, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आरटीओ तज्ज्ञाच्या मते, ई-रिक्षा या बेकायदेशीर आहे. जोपर्यंत त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार होत नाही, तोपर्यंत या रिक्षांना थांबविणेच योग्य आहे.
कायदा हातात घेण्याचा अधिकार रिक्षाचालकांना नाही. या रिक्षाचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, किंवा कारवाई कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आॅटोरिक्षा चालक संघटनेनेही या ई-रिक्षाला विरोध दर्शवून नियमबाह्य धावणाऱ्या या रिक्षांवर कारवाई करण्याचे निवेदन आरटीओला दिले आहे.
आरटीओने आतापर्यंत तीन ई-रिक्षा जप्त केल्या असून ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)