मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:44+5:302020-11-28T04:07:44+5:30

उमरेड : शहरात मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सातत्याने सुरूच आहे. यामुळे मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, ...

Action continues against those who do not use masks | मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच

उमरेड : शहरात मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सातत्याने सुरूच आहे. यामुळे मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, आतापावेतो ४ लाख ६७ हजार रुपयांची दंडात्मक वसुली पालिकेने केली असल्याची माहिती मुख्याधिकारी राजेश भगत यांनी दिली. बुधवारी (दि. २५) १३ हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचा भंग करणाऱ्या दोघांचा तसेच मास्क न वापरणाऱ्या १८ जणांचा समावेश आहे.

Web Title: Action continues against those who do not use masks