रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:49+5:302021-03-26T04:09:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ...

Action against those walking without masks at the railway station | रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६५७१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६६ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलीस बल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दररोज कारवाई केली जात आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १, धरमपेठ १०, हनुमाननगर १, धंतोली ५, नेहरूनगर ६, गांधीबाग ४, सतरंजीपुरा ३, लकडगंज ४, आशीनगर १०, मंगळवारी झोन अंतर्गत १४ आणि मनपा मुख्यालयातील १ जणाविरुद्ध कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against those walking without masks at the railway station