अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:01+5:302021-02-06T04:12:01+5:30

पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी विशेष कारवाई मोहीम राबवून बुधवारी दिवसभरात बिनाकी मंगळवारी, पोळा ...

Action against illegal liquor dealer | अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी विशेष कारवाई मोहीम राबवून बुधवारी दिवसभरात बिनाकी मंगळवारी, पोळा मैदान तसेच राजीवनगरात ठिकठिकाणी छापेमारी केली. या छाप्यांत पोलिसांना दिलीप प्रल्हाद धकाते, ईश्वर मारोतीराव तडस, उमेश मधुकर धकाते, राजेश प्रल्हाद निनावे, मदन कृष्णराव माैदेकर, दीपाली पराते आणि शहबाज अली ईकबाल अली हे सात अवैध दारू विक्रेते पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू तसेच अन्य साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

----

सराईत घरफोडे गजाआड

नागपूर : वाठोडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. शेख जावेद उर्फ बबलू शेख भुरू (वय ४५, रा. यशोधरानगर) आणि अयफाज शेख अनिस शेख (वय ३०, रा. शारदानगर, बहादुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

वाठोड्यातील अनुप डागा यांच्याकडे २ जानेवारीला घरफोडी झाली होती. त्यात आरोपी जावेद आणि अयफाजचा सहभाग असल्याचे कळाल्याने ठाणेदार अनिल ताकसांडे आणि सहकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. चाैकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देतानाच चोरलेला ऐवजही पोलिसांच्या हवाली केला. आरोपींकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.

----

Web Title: Action against illegal liquor dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.