डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:33 PM2020-10-24T23:33:10+5:302020-10-24T23:34:29+5:30

Action against drug dealer selling medicines without doctor's prescription, Nagpur news प्रतिबंधित अल्प्राझोलम (०.५ एमजी) औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणाऱ्या एका औषध दुकानदारावर अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडी) आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.

Action against drug dealer without doctor's prescription | डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : प्रतिबंधित अल्प्राझोलम (०.५ एमजी) औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणाऱ्या एका औषध दुकानदारावर अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडी) आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. कारवाईनंतर एफडीएने दुकान बंद केले. दुकानातून ३२० रुपयांच्या १० पॅकेट गोळ्या जप्त केल्या. या गोळ्यांचा उपयोग तरुण नशा करण्यासाठी करतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीविना या गोळ्या विकता येत नाहीत. पण पोलिसांनी सापळा रचून एका व्यक्तीला दुकानात गोळ्या विकत घेण्यासाठी पाठविले. फार्मसिस्टने निर्धारित मूल्य ३२ रुपयांऐवजी ५० रुपये घेऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गोळ्यांची विक्री केली. याची माहिती पोलिसांनी एफडीएचे सहायक आयुक्त डॉ. पी.एम. बल्लाळ यांना दिली. त्यांनी औषध निरीक्षक नीरज बाहेकर यांच्यासमवेत दुकानावर धाड टाकली आणि दुकानाचे मालक राहुल राजकुमार कृपनानी (२७ वर्ष), जरीपटका यांची चौकशी केली. दुकानाची झडती घेतली असता दुकानात ३२० रुपये किमतीचे अल्प्राझोलम औषधांच्या गोळ्यांचे १० पॅकेट आढळून आले. अधिकाऱ्यांनी फार्मसी बंद केली. मालकावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Action against drug dealer without doctor's prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.