२८ प्रतिष्ठानांवर कारवाई, २.१० लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:07 IST2021-04-25T04:07:39+5:302021-04-25T04:07:39+5:30

लक्ष्मीनगर झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, ...

Action against 28 establishments, fine of Rs 2.10 lakh | २८ प्रतिष्ठानांवर कारवाई, २.१० लाखाचा दंड

२८ प्रतिष्ठानांवर कारवाई, २.१० लाखाचा दंड

लक्ष्मीनगर झोनमध्ये दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, हनुमाननगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार, धंतोली झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये दंड केला. नेहरूनगरच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, गांधीबाग झोनमध्ये पाच ठिकाणी तपासणी करून ३५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार, आसीनगरमध्ये १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, लकडगंज झोनमध्ये १७ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार तर मंगळवारी झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 28 establishments, fine of Rs 2.10 lakh