थुंकणे व कचरा टाकणाऱ्या २९ उपद्रवींना नागपुरात दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 09:05 PM2019-12-06T21:05:14+5:302019-12-06T21:26:22+5:30

शहरातील झाशी राणी चौक सीताबर्डी येथे अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणाऱ्या २९ उपद्रवींवर शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाने कारवाई केली.

Action on 29 miscreants for spit and garbage in Nagpur | थुंकणे व कचरा टाकणाऱ्या २९ उपद्रवींना नागपुरात दणका

थुंकणे व कचरा टाकणाऱ्या २९ उपद्रवींना नागपुरात दणका

googlenewsNext
ठळक मुद्देझाशी राणी चौकात धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाची कामगिरी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरातील झाशी राणी चौक सीताबर्डी येथे अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणाऱ्या २९ उपद्रवींवर शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाद्वारे शुक्रवारी सीताबर्डी येथील झाशी राणी चौक, मोरभवन बस स्थानक येथे थुंकणारे व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाकडून संयुक्तरीत्या सीताबर्डी परिसरात उपद्रवींविरोधात कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. तिन्ही झोनच्या पथकातील ४ कर्मचारी असे एकूण १२ कर्मचाऱ्यांनी परिसरात विविध भागात उपद्र्रव करून शहर विद्र्रुप करणाऱ्यांवर दंड ठोठावला.
झाशी राणी चौक, मोरभवन परिसर तसेच सिग्नलवर थुंकणाऱ्या १६ व्यक्तींकडून ३२०० रुपये व खर्रा खाऊन पॉलिथिन टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्या १३ जणांवर कारवाई करीत १३०० रुपये असे एकूण २९ जणांवर कारवाई करून ४५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुष्पगुच्छांसाठी प्लास्टिकचा वापर केल्यास कारवाई
 फुल विक्रेत्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या पुष्पगुच्छांना प्लास्टिकचे आवरण लावले जाते. प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकचा वापर प्रतिबंधित असल्याने पुष्पगुच्छांसाठी लावण्यात येणारे प्लास्टिकही प्रतिबंधित आहे. त्यामुळे पुष्पगुच्छाला यापुढे प्लास्टिक लावण्यात येऊ नये. यापुढे पुष्पगुच्छांसाठी प्लास्टिकचा वापर निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद फुल तसेच पुष्पगुच्छ विक्रेत्यांना उपद्रव शोध पथकाद्वारे देण्यात आली आहे.

Web Title: Action on 29 miscreants for spit and garbage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.