नागपूर जिल्ह्यात महिला डॉक्टरवर अॅसिडहल्ला; आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:31 IST2020-02-13T14:01:35+5:302020-02-13T14:31:08+5:30
हिंगणघाटच्या घटनेतून समाजमन बाहेर येत नाही तोच, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.

नागपूर जिल्ह्यात महिला डॉक्टरवर अॅसिडहल्ला; आरोपी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:हिंगणघाट येथील जळीत जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसात उमटत असताना सावनेर (जिल्हा नागपूर) येथे महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी झाले आहेत. शिवाय, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला.
नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या या महिला डॉक्टर असिसंन्ट लेक्चरर आहेत. त्या गुरुवारी नेशनल एड्स कंन्ट्रोल आँग्रोनायजेशन (नँको) या प्रोजेक्टकरीता सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या.
सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि, तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. यात या महिला डॉक्टरने चेहरा बाजूला केल्याने या अॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर व अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.
हा प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला डॉक्टरसह अन्य दोन जखमींना तात्काळ नागपूरला रवाना केले असून पोलिस तपास सुरू आहे.