डिलेव्हरी गर्लची बॅग पळविणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST2021-08-19T04:12:00+5:302021-08-19T04:12:00+5:30

नागपूर : डिलेव्हरी गर्ल म्हणून काम करणाऱ्या युवतीची १.५२ लाखाचा मुद्देमाल असलेली बॅग पळविणाऱ्या आरोपीस हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली ...

Accused of snatching delivery girl's bag arrested | डिलेव्हरी गर्लची बॅग पळविणाऱ्या आरोपीस अटक

डिलेव्हरी गर्लची बॅग पळविणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर : डिलेव्हरी गर्ल म्हणून काम करणाऱ्या युवतीची १.५२ लाखाचा मुद्देमाल असलेली बॅग पळविणाऱ्या आरोपीस हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० जुलैला खुशबू हनुमानप्रसाद गुप्ता (२४) रा. अयोध्यानगर ही तुकडोजी चौकातील धनश्री अपार्टमेंटमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी गेली होती. ती आपली बॅग अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आपल्या दुचाकीवर ठेवून पहिल्या माळ्यावर गेली. तेवढ्यात आरोपीने संधी साधून तिची एक लाख ५२ हजार ५४ रुपयाचा मुद्देमाल असलेली बॅग पळविली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, दुय्यम निरीक्षक चांदुरे, सहा.पो. निरीक्षक स्वप्निल भुजबळ, हवालदार दीपक मोरे, राजेश मोते, राजेश धोपटे, प्रफुल वाघमारे, दीपक तरेकर यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी स्वप्निल विजय दंदी (२२) रा. सोमवारी क्वाॅर्टर रघुजीनगर यास अटक केली. त्याच्या ताब्यातून ॲमेझॉन कंपनीचे १३ पार्सल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत ३० हजार असा एकूण १ लाख ६८ हजार १५९ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Accused of snatching delivery girl's bag arrested