शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयवर बलात्काराचा आरोप

By admin | Updated: September 9, 2016 03:09 IST

शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा आरोप लावला.

लग्नाला नकार : प्रेयसीची पोलिसांकडे तक्रारनागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा आरोप लावला. सचिन वामन मत्ते (वय ३०) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो अंबाझरीतील रविनगर शासकीय वसाहतीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान ठाण्यात कार्यरत असलेला उपनिरीक्षक सचिन आणि तक्रारकर्ती तरुणी (वय २३) एकाच जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ही तरुणी आणि सचिनच्या मामेबहिणीची ओळख आहे. तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असल्यामुळे तिने सचिनकडून ‘मार्गदर्शन’ घेणे सुरू केले. डिसेंबर २०१५ मध्ये मामेबहिणीकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यांच्यात नियमित बातचीत होऊ लागली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जून ते आॅगस्ट २०१६ या तीन महिन्यात या दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीच्या तक्रारीनुसार, प्रत्येकवेळी सचिनने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. आता मात्र तो लग्नाला नकार देत होता. या कारणावरून ६ सप्टेंबरला त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. सचिनने यावेळी तिला मारहाण केली. अश्लील शिवीगाळही केली. त्यामुळे तरुणीने अंबाझरी ठाण्यात धाव घेतली. ती बलात्काराची तक्रार देणार असल्याचे लक्षात आल्याने तिचे मन वळविण्याचे बरेच प्रयत्न झाले. बुधवारी या दोघांनाही एकत्र बसवून त्यांचे मन वळविण्याचे आणि समेट घडवून आणण्याचे पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. मात्र, लग्न केले तरच आपण तक्रार करणार नाही, अशी भूमिका तरुणीने घेतली तर, सचिनने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सचिन मत्तेविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.(प्रतिनिधी)प्रकरणाला दुसरी बाजूया प्रकरणाला दुसरी बाजू असल्याचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याचमुळे गुन्हा दाखल करण्यात आला तरी पोलीस अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. बलात्कारासारखा गंभीर आरोप लागूनही सचिनने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली कोणतीही तपासणी करा, कशीही चौकशी करा, असा पवित्रा घेतला. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही द्विधा मनस्थितीत सापडले आहे. दुसरीकडे या प्रकरणाने पोलीस दलातही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.